Now Loading

चिखली दहशतमुक्त करा - आमदार श्वेता महाले पाटील

चिखली ÷ चिखली शहरात दिवसेंदिवस निष्पाप व निरपराध नागरिकांवर दिवसाढवळ्या पिस्तुल , तलवारी , चाकू , फायटरने हल्ले करून नागरिकांचे मुडदे पाडत आहे.सोबतच वाटमारी , दरोडे , टाकून नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे चिखली नगरवासी प्रचंड दहशतीमध्ये असल्याने गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करून चिखली शहर दहशत मुक्त करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे.            दि 16 /11/20021 रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की , चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील मुख्य रस्त्यावरील आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात  दि. 16 नोव्हेंबर च्या रात्री 9:45 वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी 02 दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याने चिखली शहरातील प्रसिध्द व्यापारी स्व कमलेश पोपट यांचे त्यात निधन झाले आहे.          चिखली शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून आघाडी सरकारच्या काळात जिकडेतिकडे लूटमार सुरू असल्याचे चित्र आहे . अशा घटना राज्यभरात घडत आहे . गत  काही दिवसांपूर्वी भाजपाचे जेष्ठ नेते व चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष मा सतिशजी गुप्त यांच्यावर औरंगाबाद नाशिक रस्त्यावर प्राणघातक हमला होऊन त्यात ते जबर जखमी झालेले आहे .            दि 13 /11/2021 रोजी रविवारी सकाळी 9 च्या सुमारास श्री शाम वाकदकर यांच्यावर सुद्धा तीन हल्लेखोरांनी हल्ला करुन त्यांना जबर जखमी केले आहे. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी मध्ये धाव घेतली नसती तर त्यांच्या जीवावर बेतले असते.         दि 12 /9/2021 रोजी चिखली येथील वेंकटेश नगर , जाफराबाद रोड वरील श्री पंजाबराव देशमुख यांच्याकडे तर त्याच दिवशी हरिओम नगर मधील यांच्याकडे महालक्ष्मी पूजनाच्या दिवशीच चोरी झालेली आहे.          दि 3/11/2021 रोजी देऊळगाव राजा येथील दिवाळीच्या एक दिवस आधीच भावसार कलेक्शन या ठिकाणी सुद्धा चिखली येथील कालच्या घटनेचे साधर्म्य सांगणारी घटना घडलेली आहे. भावसार कलेक्शन मध्ये सुद्धा दुकान बंद केल्यानंतर हिशोब तपासत असताना दुकानाचे काही शटर बंद झाल्यानंतर दोन दरोडेखोरांनी गळ्याला चाकू लावून लूट केल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे. या घटनेत भावसार यांनी प्रतिकार न केल्याने त्याठिकाणी केवळ लूट झालेली आहे. याच घटनेची पुनरावृत्ती काल चिखली आनंद इलेक्ट्रॉनिक येथे घडलेली आहे.          महिन्याभरापूर्वीच केलवद येथील स्टेट बँक लुटून नेली . शेलुद व उंद्री येथील ATM फोडले . खून ,दरोडा आणि लुटमारीच्या दिवसेंदिवस घटना वाढत असल्याने  व झालेल्या हल्ल्याने संपूर्ण चिखली शहरवासी दहशतीत आहे .             तसेच दसऱ्याच्या एक दिवस आधीचम्हणजेच दि 14 / 10/2021 रोजी  केळवद येथिलच पैशासाठी एका वृद्धेचा खून करण्यात आलेला आहे .        स्व.कमलेश पोपट यांच्यावरील हल्ल्याचे CCTV फुटेज पाहिले असता दरोडेखोर नराधमांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसत नाही एव्हढे ते सराईत वाटत आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची वेळ आणि हे अत्यंत वर्दळीचे असतांना हल्लेखोर किती निर्ढावलेले होते हे सिद्ध होते.           वरील व इतर घटनांपैकी केळवद येथील ATM फोडीमधील गुन्हेगारांनाच पकडण्यात पोलिसांना यश आलेले आहे .उर्वरित घटनेतील आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही .  *गुन्हेगारांना तात्काळ जेरबंद करा*            शहरात व जिह्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाने तातडीने यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजे .यातील आरोपींना तातडीने जेरबंद करून कठोर शिक्षा करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन कठोर पाऊले उचलावे लागतील याची नोंद घेण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आलेला आहे.