Now Loading

महागाईचा बिमोड करण्यासाठी ‘जनजागरण अभियानात’ नागरीकांनी सामिल व्हावे - माजी आमदार राहुल बोंद्रे

चिखली : केंद्रात भाजपाची सरकार असतांना राज्यात महागाईचा भस्मासुर उसळला असुन या विरोधात प्रदेश काॅगे्रसच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हयात महागाई विरोधात जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. त्या अभियानाचा एक भाग म्हणुन चिखली तालुका व शहर काॅगे्रस कमिटीच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर ला बैठकीचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी महागाईच्या भस्मासुराचा बिमोड करण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांनी या अभियानात मोठया संख्येने सामील व्हावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी यावेळी कार्यकत्र्यांना केले. या जनजागरण अभियानाची सूरूवात लोणार तालुक्यातील मौजे टिटवी या गावातुन सुरू करण्यात आली.      चिखली तालुका व शहर काॅग्रेसच्या वतीने स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे कार्यकत्र्यांना संबांधीत करतांना म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने जिवनावश्यक वस्तुंसह इंधन या महत्वाच्या घटकात कमालीची महागाई केली आहे. या महागाई विरोधात बुलडाणा जिल्हा काॅगे्रसने रणशिंग फुंकले असुन जिल्हयात मोठया संख्येने प्रत्येक तालुक्यात गावखेडयात महागाई विरोधात जनतेच्या हक्कासाठी जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. अच्छे दिन म्हणुन तुमच्या आमच्या नशिबी, आली ती फक्त महागाई. उत्पन्न कमी आणी महागाई मात्र दुप्पट झाली, केंद्रात सत्तास्थानी बसविलेल्या मोदी सरकारने जनतेप्रति कृतज्ञ असणे, आणी त्यांच्यासाठी सत्तेचा कार्यभार चालविणे हे मोदी सरकारचे कर्तव्य असुन या तत्वांचा विसर हा मोदी आणी त्यांच्या लोकप्रतिनिधींना पडला आहे. असे सांगुन बुलडाणा जिल्हा काॅगे्रस महागाई विरोधात दिनांक 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे.  या कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदार संघात पक्ष निरीक्षक म्हणुन उपस्थिती असलेले गणेशराव पाटील, संजुभाउ किनगे यांचीही समयोचित भाषणे झाली. या जनजागरण अभियाना अंतर्गत चिखली मतदार संघात 19 नोव्हेंबर रोजी स्व. पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंती दिनी प्रभात फेरी काढुन जनजागृती करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री स्व.यशवतंराव चव्हाण यांच्या स्मृती दिना निमित्त प्रमुख गांवामध्ये महागाई विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. तर 26 नोव्हेंबर रेाजी संविधान दिना निमित्त चिखलीसह प्रमुख गावांमध्ये ज्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळया समोर सविधान वाचन करण्यात येणार आहे.  या सर्व कार्यक्रमांमध्ये चिखलीकरासह संपुर्ण जिल्हा वासियांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या बैठकी त अपघातात दुर्देवी  मुत्य पावलेल्या काॅग्रसचे तालुका विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रसाद ठेंग तथा स्व.राजेंद्र सुरडकर यांना श्रध्दांजली  वाहण्यात आली.  देशाच्या स्वातंत्र्य संदर्भात वादग्रस्त विधान करणा-या कंगना रानावत यांचा निषेधाचा ठराव घेण्यात आला. यावेळी  चिखली तालुका काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती संचालक, विश्वस्त, युवक काॅगे्रस, महिला काॅगे्रस, सेवादल, सह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.