Now Loading

कल्याण शिळ फाटा ते पुजा पंजाब हॉटेल रस्त्याचे काम तातडीने करा.... मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी...

कल्याण शिळ फाटा ते पुजा पंजाब हॉटेल एमआयडीसी सर्विस रस्ता अत्यंत खराब झाला आहे.या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे.नवी मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.तरी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. याच रस्त्याच्या कामाबाबत मनसे आमदार पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना पत्र सुद्धा दिले आहे.सदर रस्त्याचे संपूर्ण काम केले जाईल.या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून १ महिन्याच्या कालावधी पूर्ण होईल असे अधिकारी यांनी सांगितले.तर तो पर्यंत या रस्त्याचे खड्डे तातडीने भरावे अशी सूचना आमदार यांनी केली आहे.