Now Loading

अप्पर कोपर रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची जीव घेणी कसरत दिवा वसई मार्गावर गर्दीच्या वेळेत गाड्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी

डोंबिवली दिवा दरम्यानच्या पनवेल वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरील प्रवाशाची संख्या दिवसेदिवस वाढत आहे .या प्रवाशांना कमीत कमी वेळेत पश्चिम उपनगराशी जोडणारा दिवा - कोपर ते वसई हा रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आला. मात्र 15 वर्षे उलटल्या नंतरही या मार्गावर मोजक्याच गाड्या चालविल्या जात आहेत .त्यामुळे वसईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत .अप्पर कोपर स्थानकातून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी पावणे सहा नंतर थेट सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दुसरी गाडी या मार्गावरून धावते. मधल्या काळात या मार्गावर गाडीच नसल्यामुळे प्रवाशाचे हाल होत असून सव्वा दहा वाजता धावणाऱ्या गाडीला तोबा गर्दी उसळते. ही गाडी पकडण्यासाठी प्रवासी रुळावरून जीव घेनी कसरत करत ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात .त्यामुळे या मार्गावर रेल्वेचा फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे डोंबिवली दिवा दरम्यानच्या पनवेल वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरील प्रवाशाची संख्या दिवसेदिवस वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून हे स्थानक मात्र दुर्लक्षितच राहिले आहे.या मार्गावर मेमु ट्रेन (मेनलाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट )धावतात.अप्पर कोपर स्थानकातून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी 5 वाजून 44 मिनिटाला पहिली गाडी येते त्यानंतर दुसरी गाडी थेट तीन तासांनी 10 वाजून 14 मिनिटाने धावते. या मार्गावरूनदिवसभरात 14 गाड्या धावत असल्या तरी प्रत्येक गाड्या मध्ये 2 ते अडीच तासाचे अंतर आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी पावणे सहा नंतर थेट सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दुसरी गाडी या मार्गावरून धावते. मधल्या काळात या मार्गावर गाडीच नसल्यामुळे प्रवाशाचे हाल होत असून सव्वा दहा वाजता धावणाऱ्या गाडीला तोबा गर्दी उसळते. कमीत कमी खर्चात कमी वेळात भिवंडी ते वसई मार्गावरील इच्छित स्थळी पोचता येत असल्यामुळे तीन तासांच्या अंतराने येणाऱ्या गाडीमध्ये जागा पटकवण्यासाठी प्रवाशी जीवावर उदार होत आहेत. प्रवासी देखील ट्रॅक मधून गाडीच्या शिडीवरून गाडीत प्रवेश करत असल्यामुळे अनेकदा प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागते यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे . गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी प्लॅटफॉर्मसह चक्क रेल्वे रुळावर, जिन्यात जिथे जागा मिळेल तिथे ठाण मांडून बसतात आणि धावत्या ट्रेन मध्ये दोन्ही बाजूने गाडीत शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे भयाण वास्तव आहे .रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशाच्या सोयीसाठी या मार्गावरील गाड्याची संख्या वाढविण्याची मागणी असताना अद्याप निर्णय घेतला जात नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे