Now Loading

कल्याण रेल्वे स्थानकातील घटना प्लटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅप मध्ये सापडलेल्या प्रवाशाला पॉईंट मन दिले जीवनदान

कल्याण रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे वेळ देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती आली .काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हावडा एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली .या एक्स्प्रेस मध्ये एक प्रवासी चढत असताना त्याचा तोल गेला व हा प्रवाशी प्लॅट फॉर्म आणि एक्स्प्रेसच्या गॅप मध्ये पडला इतक्यात एक्स्प्रेस सुरू झाली . कर्तव्यावर असलेल्या पॉईंट मॅन  शिवजी सिंग यांच्या ही बाब लक्षात आली त्यानी तत्काळ प्रसंगावधान राखत धाव घेत या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं दरम्यान इतर प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चैन पुलिंग करण्यात आली होती. त्यामुळे एक्सप्रेस देखील काही क्षणातच थांबली त्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला .