Now Loading

भिवंडीचा इंडस्ट्रिअल कचरा कल्याणात ; संबंधित टेम्पोचालक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी मधील 5 टन इंडस्ट्रिअल कचरा ट्रकद्वारे बारावे येथील ट्रान्स्फर स्टेशन येथे अनधिकृतरीत्या टाकण्यात येत असताना बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालक आणि बेजबाबदार महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर सौराष्ट्र कंपनी यांनी त्याबदल कोणत्याही प्रकारची माहिती नाही असे सांगितले तर सदर कचरा कुणाच्या आशीर्वादाने येथे अनधिकृतरीत्या टाकला जात आहे असा सवाल ही संस्थेने विचारून याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा लवकरच बारावे, गोदरेज हिल रहिवासी जन-आंदोलन करणार असा इशारा संस्थेचे अध्यक्ष घेगडे यांनी दिला आहे.