Now Loading

दिवा स्टेशन विविध समस्याबाबत आमदार राजू पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची घेतली भेट

दिव्याला सुविधा हव्या मध्य रेल्वे वरील अत्यंत महत्वाच्या दिवा रेल्वे स्थानकावरून दिवसाला हजारो प्रवासी येजा करतात. या रेल्वे स्थानकातून दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त तिकीट विक्री होते पण प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा मात्र अतिशय तोकड्या आहेत. यासाठी अत्यंत महत्वाची व तातडीची कामे करण्याबाबतीतचे निवेदन एडीआरएम ऍडमिन डॉ सुमन देउळकर, सिनियर डीसीएम श्री गौरव झा, सिनियर डीइएन श्री एस के गर्ग यांना दिले. मनसे रेल्वे सेना अध्यक्ष. श्री जितेंद्र पाटील, श्री. तुषार पाटील सोबत उपस्तिथ होते. खालील कामे निवेदनात समाविष्ट केली. दिवा रेल्वे स्थानकातून दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त तिकीट विक्री होते. तिकीटघर पश्चिमेला असून यावर प्रवाशांची मोठी लाईन लागते. त्यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागते. दिवा परिसरात ८० टक्के लोकसंख्या पूर्वेला राहते त्यामुळे त्यांना पश्चिमेला जाऊन तिकीट काढण्याचे दिव्य करावे लागते. यासाठी दिवा पूर्वेला त्वरित तिकीट घर बांधण्याची आवश्यकता आहे. दिवा स्थानकातील केवळ प्लॅटफॉम क्रमांक १ वर शौचालय आहे. तरी दिवा पूर्वेला जागा उपलब्ध करून शौचालय बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी. दिवा पश्चिमेला असणाऱ्या तिकीट घराजवळची लाईन इमारतीच्या बाहेरच्या रस्त्यापाशी येते. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट घरासमोरील उपलब्ध जागेत शेड उभे करून कार्यवाही करण्यात यावी.