Now Loading

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लटफॉर्म क्रमांक एक खाली बनले डम्पिंग ,दुर्गंधी मुळे प्रवासी त्रस्त कचर्याची केडीएमसी घनकचरा उपायुक्ताकडून पाहणी

डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी, दुकानदार, फेरीवाले, स्टोलधारक यांच्यामुळे तयार होणारा कचरा गोळा करून हा कचरा रेल्वेच्या पादचारी पुलाखाली गोळा केला जात असून  महिनाभरापासून हा कचरा उचलण्यात आलेला नसल्याने या कचर्याचा ढीग साचला आहे. या कचर्याच्या दुर्गंधी सह या कचऱ्याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने स्थानकाच्या सुरक्षेसह प्रवाशाना त्रास सहन करावा लागत आहे. काल या कचर्याने पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर या कचर्याची आज महापालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी पाहणी केली .यानंतर हा कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचे स्पष्ट करत शहर स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासनाने या कचर्याची सुका आणि ओला अशी विगतवारी करत विल्हेवाट लावावी अशा सूचना संबंधित।रेल्वेच्या ठेकेदाराला दिल्या आहेत. तसेच आतापर्यत महापालिकेने रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतून किती कचरा उचलला आहे याची माहिती घेत त्याचा अधिभार ठेकेदाराकडून वसूल केला जाणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.तर स्टेशन परिसरातील  अस्वच्छतेमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याने हि अस्वच्छता खपवून घेणार नसल्याची तंबी देखील त्यांनी ठेकेदाराला दिली आहे.  डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराच्या स्वच्छता करण्याचे काम ठेकेदार संजीवनी एटरप्रायजेस या ठेकेदाराला देण्यात आले असून ठेकेदाराकडून दिवसभराचा स्थानकातील कचरा गोळा करून तो पादचारी पुलाखाली साठवला जातो. ओला आणि सुका कचरा एकत्रित असल्यामुळे या कचर्याची दुर्गंधी पसरली असून या कचर्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने स्थानकाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.  आज उपायुक्त कोकरे यांनी या कचर्याची पाहणी केली यानंतर रेल्वे हि स्वतंत्र आस्थापना असूनरेल्वेच्या कचर्याची जबाबदारी महापालिकेची नसल्याचे स्पष्ट करत रेल्वे प्रशासनाने कठोर नियमावली तयार करत कचर्याची विगतवारी करत त्याची विल्हेवाट  लावत परिसर स्वच्छ ठेवावा अशा सूचना दिल्या तसेच रेल्वेच्या परिसरातील कचर्याची महापालिका जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे सांगत आतापर्यत रेल्वेच्या हद्दीतून महापालिकेने उचललेल्या कचर्याचा अधिभार देखील रेल्वेच्या ठेकेदाराकडून वसूल केला जाणार असून हि जबाबदारी तेथील स्वच्छता निरीक्षकावर सोपविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.