Now Loading

केंद्र सरकारच्या पी.एम.किसान योजने प्रमाणे राज्यसरकारने सी.एम.किसान योजना सुरु करावी- स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबाासाहेब पाटील कोलते

जालन (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या पंतप्रधान (पी.एम.) किसान योजने प्रमाणेच राज्यसरकारने मुख्यमंत्री (सी.एम.) किसान योजना सुरु करून महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबाासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकरी वर्गासाठी महत्वपुर्ण निर्णय घेवून पंतप्रधान किसान योजना (P.M.) किसान योजना सुरु करुन देशातील शेतकरी वर्गासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतला असून केंद्र सरकारच्या त्याच धरतीवर महाराष्ट्र शासनाने सुध्दा महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री (C.M.) किसान योजना (सी.एम.किसान योजना) सुरु करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणे अंत्यत गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये सतत दोन वर्षापासून कोरोना सारख्या महामारीमुळे व अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधार व्हावा म्हणून केंद्र सरकारने देशातील शेतकरी वर्गासाठी दरवर्षी 6000 रुपये दोन हजार रुपये प्रमाणे तीन टप्यात दिले जातात त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्यसरकारने शेतकऱ्यासाठी प्रतीवर्षी 6000 रुपये देऊन आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. आतापर्यंत केंद्रसरकारच्या पी.एम.किसान योजने अंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ हप्ते जमा झाले असून दहावा हप्ता डिसेंबर अखेर जमा होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार कडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्यसरकारने सुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यसरकारने सुध्दा सी.एम. (C.M.) मुख्यमंत्री किसान योजना राबवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीवर्षी 6000 रुपये तिन टप्यात केंद्रसरकारप्रमाणे आर्थिक मदत करावी, अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.