Now Loading

राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेकरिता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनिधी : नेटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व हिंगोली जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या 14 व्या सबज्युनियर राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी तसेच दिनांक 3 ते 5 डिसेंबर 2021 दरम्यान जालना येथे होणार्‍या 14 व्या राज्यस्तरीय सिनीयर नेटबॉल स्पर्धेसाठी जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशन च्या वतीने दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रविवार रोजी देवगिरी इंग्लिश स्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली जालना येथे सकाळी 11 वाजल्यापासून निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे, निवड चाचणीतून सबज्युनीयर स्पर्धेसाठी 12 मुले व 12 मुलींची तसेच सिनीयर स्पर्धेसाठी 12 पुरूष व 12 महिलांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात येणार आहे.      निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून सबज्युनीयर स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंचे वय 16 वर्षाच्या आत व जन्मतारीख 1/8/2005 च्या नंतरची असणे आवश्यक आहे.                   अधिक माहितीसाठी जिल्हा संघटनेचे सचिव शेख चाँद पी.जे. मोबाईल नंबर 9822456366 किंवा जयकुमार वाहूळे 9011151426, मंगेश सोरटी, नितीन जाधव, संतोष वाघ यांच्याशी संपर्क साधावा. निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनि सहभाग नोंदवावा असे आवाहन जालना जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक बाला भैय्या परदेसी, देवगीरी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बबन दादा सोरटी, नगरसेवक जयंत भोसले, माजी नगरसेवक मिर्झा अनवर बेग, नगरसेवक शेख शकील, नगरसेवक ज्ञानेश्‍वर ढोबळे, अल्पसंख्याक सेना अध्यक्ष शेख जावेद,  सुभाष पारे, जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन, व कला क्रीडा दूत फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. --------------------------------------