Now Loading

खळकी येथील फळबाग शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून माहितीच मिळत नसल्याचे तहसिलदार यांना निवेदन. हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे खळकी ता. सेनगाव जि. हिंगोली येथे तिस ते चाळीस शेतकरी हंगामीपिकासह फळबागांची लागवड करतात परंतु या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नेमणुक केलेले कृषी अधिकारी कार्यालयीन वेळेनुसार नेमनुक केलेल्या ठिकाणी येत नसल्याने शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळात नसल्याने आज मौजे खडकी येथील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन देत कृषी सहायक गावात येत नसुन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान, ठिंबक सिंचन,माती परीक्षण नमुने एक वर्षापासून दिले नाही अशा विविध तक्रार करत शेतकऱ्यांनी निवेदन देत कृषी सहायक बदलुन द्यावा अशी मागणी केली आहे.निवेदनावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.