Now Loading

*उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना निलंबित करण्याची कळमनुरी वकील संघाची मागणी* कळमनुरी वकील संघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंञी *मा.उध्दवजी ठाकरे* यांना आज दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी कळमनुरी तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी *क्रांती डोंबे* ह्या वकील बांधवांना अरेरावीची उध्दट भाषा बोलून मी म्हणेल तसे काम करावे लागेल, तुम्ही हजर राहा नाहीतर ३५३ ची पोलीस केस करण्याची धमकी देऊन हुकूमशाही पध्दतीने कामकाज करून दहशत निर्माण करत असल्यामुळे त्यांना त्वरीत निलंबित करून न्यायलयीन प्रकरण चालविण्यासाठी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात कळमनुरी वकील संघाचे अध्यक्ष ॲड .सुनिल घोंगडे ,सचिव ॲड .विवेक दैठणकर,उपाध्यक्ष सतीश जाधव, माजी अध्यक्ष ॲड .रवि शिंदे ,मोहम्मद एकबाल ,ॲड .अझरोद्दीन कादरी,ॲड .उमेश जिंतुरकर ,ॲड .एल.एल.सिरसाट , ॲड .मजहर अली जामकर ,ॲड .अश्रफी ,ॲड .सिद्दीकी ,ॲड .सौ.काळे मँडम ,ॲड .के.पी.जोंधळे , ॲड .ईलियास नाईक ,ॲड .सुरेश गरड, ॲड .तातेराव देशमुख ,ॲड .मुढाळ,ॲड .संतोष नरवाडे ,ॲड .अमोल डिग्गीकर ,ॲड .मुदस्सीर अश्रफी ,ॲड .डी.पी.जाधव, ॲड .जे.आर.जाधव, ॲड .अविनाश काळे, ॲड .मुन्ना नाईक ,ॲड .जी.एम.नागरे, ॲड .मोहसिन इनामदार ,ॲड .खंदारे,ॲड .शेख शकील, अझर पठाण ,ॲड .पी.के.तडस यांच्या सर्व वकील सदस्य सामिल होते.