Now Loading

शेंदूर्णी येथे रथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी प्रती पंढरपूर नगरीत श्री संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सुरू केलेला रथ उत्सव यावर्षी पूजा शेंदुर्णी नगरपंचायत चे नगराध्यक्ष सौ. विजयाताई अमृतराव खलसे बापूसाहेब अमृतराव नामदेवराव खालसे आणि शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सचिव दाजीसाहेब सतीशचंद्र काशीद सौ. उज्वलाताई सतीशचंद्र काशीद संचालिका शेंदुर्णी शिक्षण संस्था यांच्या हस्ते यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली याप्रसंगी यावेळी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दादा गरुड संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत गोविंदा शेठ अग्रवाल सागरमल जैन शांताराम बापू गुजर सुधाकर बारी इत्यादी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बंदोबस्तासाठी पहूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. धनवटे साहेब त्यांचा स्टाफ उपस्थित होते.