Now Loading

बिंदू नामावली तपासणी सुरुकरा....महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे नाशिक विभागीयआयुक्त यांना निवेदन.

धुळे    राज्यातील मराठा,ओ बी सी व इतर आरक्षण बदलांमुळे मगिल सुमारे दोन वर्षांपासून राज्यातील विविध विभागातील बिंदूनमावली रजिस्टर (रोष्टर)तपासणी बंद करण्यात आली आहे.परंतु त्यामुळे अनेक शाळांना रोष्टर तपासणी करतायेत नसल्यामुळे विविध अडचणींनासामोरेजावेलागतआहे.ज्या मध्ये प्रामुख्याने राज्यातील विनाअनुदानित शाळांचे त्यामुळे मोठे नुकसान होतआहे.कारण राज्यातील शेकडो शाळा या विनाअनुदानित असून त्यांच्यावर अजूनही सुमारे 50 ते 60 हजार शिक्षक विनावेतन कामाकरता आहेत.या शिक्षकांना न्यायमिळावा यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे वतीने अनेक आंदोलने करण्यातआली व त्या नंतर शासनाने या शाळांचे। मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतलाआहे.परंतु त्या मूल्यांकणासाठी रोष्टर तपासणी ची अट प्रमुख असल्याने या शाळा तपासणीत रोष्टर ची तपासणी नसल्याने त्रुटीत आल्या असून त्या अपात्र ठरणार आहेत ,व या मुळे या शाळांच्या समोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. व नाशिक विभागातील सुमारे दीड ते दोन हजार शिक्षकांना व राज्यातील हजारो शिक्षकांना पगारापासून वंचितराहावे लागणार आहे. या बाबत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सर्वप्रथम आवाजउठवत राज्याचे शिक्षण आयुक्त मा विशाल सोलंकी साहेब यांना दि 15/11रोजी निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली होती त्यावेळी मा आयुक्त शिक्षण यांनी या शाळांची यादी तयार करून त्यांना विशेष बाब म्हणून त्यांचे रोष्टर तपासुन देण्यात यावे असे पत्र काढण्याचे आश्वासन दिले आहे.       तथापि काल दि 16/11/2021 रोजी नाशिक विभागा मागासवर्गीय कक्ष येथे त्या संदर्भात राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी भेट घेतली असता असे सांगण्यात आले की, जरी शिक्षण आयुक्तांनी पत्र दिले तरी अद्याप आपल्या विभागातील धुळे ,नंदुरबार व नाशिक तसेच राज्यातील आदीवासी जिल्ह्यांबाबत अद्याप बिंदू निश्चित झालेला नसल्याने आम्हालावबिंदूनमावली तपासणी करून त्या शाळांचा बिंदू निश्चित करता येणार नाही.त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून बिंदू निश्चित होत नाही तो पर्यंत आम्हाला बिंदूनमावली तपासणी करतायेणार नाही असे सांगण्यात आले.      त्यामुळे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी तात्काळ या बाबत नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त मा गमे साहेब यांना या बाबत निवेदन दिले.  सदरचे निवेदन मा सह आयुक्त मागासवर्गीय कक्ष मा सोनवणे साहेब यांनी स्वीकारले असून त्याबाबत तात्काळ शासनाकडून बिंदू निश्चिती बाबत शासनाचे निर्देश मागविण्याचे आश्वासन दिले.परंतु त्यावर शुभांगी ताईंनी ठोस भूमिका घेत आजच शासनाकडे त्याबाबत निर्देश मागवा अशी मागणी केली असता मा सह आयुक्त यांनी तात्काळ त्या बाबत शासनास पत्र काढून निर्देश मागविले आहेत.