Now Loading

चंद्रपुर शहर पोलिसांचे कायदा व सुवस्था अबाधित ठेवण्यास रूट मार्च चंद्रपुर :- त्रिपुरा राज्यात घडलेल्या प्रकाराचे पडसाद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्भवतांना दिसत आहेत. त्याचीच ठिनगी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पेटली आज अमरावती जिल्ह्यात कर्फ्यू लागलेला आहे. त्याचाच परिणाम चंद्रपुर शहरात होऊ नये, जातिय वाद, भांडण तंटे फोफाउ नये याकरिता चंद्रपुर शहर पोलिसांनी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात आज दादमहल परिसरात रूट मार्च काढण्यात आला तसेच काल घुटकाळा परिसरात रूट मार्च काढण्यात आला होता. सदरक्षणाय खलनिग्रनाय म्हणजेच सदगुणांचे रक्षण आणी दुर्गुनांचे नाश या ब्रीद वाक्याचे सामान्य जनतेत आदर असावा, शहरात कायदा, सुव्यवस्था व शांतता नांदावी याकरिता रूट मार्च काढण्यात आल्याचे शहर पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षण सुधाकर अंबोरे यांनी सांगितले.