Now Loading

रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच.

बुलढाणा - काल नागपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांनासाठी छेडण्यात आलेलं अन्न त्याग आंदोलन नागपूर पोलिसांनी रात्री मोडून काढलं. आणि रविकांत तुपकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा येथे त्यांच्या निवासस्थानी सोडण्यात आले. मात्र रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरूच ठेवल असून हे आंदोलन आता त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंडपामधून ताब्यात घेत हे आंदोलन बंद करण्यात भाग पाडलं. आंदोलन मोडून रविकांत तुपकर यांना पोलिस ताब्यात घेऊन उशिरा रात्री बुलढाणाच्या दिशेनी निघाले, यावेळीं शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्या आरोप रविकांत तुपकर यांनी केला. अनेक राजकीय पक्षांचे कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र शेतकर्यांच्याच आंदोलनामुळे कोरोना वाढतो का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. येत्या दोन दिवसात विदर्भात संघटनेच्यावतीने विविध आंदोलन करून 20 नोव्हेंबरला गाव बंद करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. तर झालेल्या अटेकचा त्यांनी निषेध नोंदवला आणि आंदोलन निवासस्थानी सुरूच ठेवले आहे.