Now Loading

क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीची यशाची परंपरा कायम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेत देदिप्यमान यश

बारामती: बारामती शहरातील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने आपल्या उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी २०२१ मध्ये NEET या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी अव्वल आले आहेत. यामध्ये वर्षा घाडगे या विद्यार्थिनीला सर्व विषयात 720 पैकी 622 मार्क्स मिळाले आहेत तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले आहेत. तसेच प्रतिक कुंभार या विद्यार्थ्याला सर्व विषयत 720 पैकी 603 मार्क्स मिळाले आहेत तर बायोलॉजी विषयात 360 पैकी 355 मार्क मिळाले. सोबतच NEET over all विषयात अकॕडमीचे 2 विद्यार्थी 600 मार्कच्या पुढे आहेत तर 8 विद्यार्थी 543 मार्कच्या पुढे आहेत व 12 विद्यार्थी 500 मार्कच्या पुढे आहेत तसेच 12 विद्यार्थी बायोलॉजी विषयात 300 मार्कच्या पुढे आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा निकाल हा दरवर्षी चांगला लागत आसतो. यंदाही ॲकॅडमीने ही यशाची परंपरा अबाधित राखून आपले नाव गुणतालिकेत अव्वल ठेवले आहे. यावर्षी NEET या परिक्षेत अकॅडमीच्या विद्यार्थींनी घवघवीत यश मिळवले आहे.या यशाचे कौतुक करीत असताना क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक काळे सर व घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यां बरोबरच क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...................... नीट परीक्षेत अव्वल आलेली वर्षा घाडगे ही विद्यार्थिनी शेतकरी शेतमजूर कुटुंबातील असून अतिशय गरीब परिस्थितीतून आलेली आहे. क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीने या विद्यार्थिनीला दत्तक घेऊन तिचा वर्षभराचा होस्टेल,मेस व इतर खर्च केला आहे.