Now Loading

वर्धा - पालकमंत्री सुनील केदार 20 नोव्हेंबरला जिल्ह्याच्या दौ-यावर

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनील केदार दि.20 नोव्हेंबर रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.दि.20 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 7.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंचनाकरीता दिवसा विज उपलब्ध करुन देणे, आर्वी, कारंजा, आष्टी व सेलू तालुक्यातील जंगलालगत शेतील कुंपण व संरक्षण करुन देणे व धडक सिंचन विहीर योजनेंअंतर्गत उर्वरित विहिरीच्या कामांना मंजूरी देणे बाबत आढावा, रात्री 8.05 वाजता आर्वी तालुक्याती भाईपुर (वाठोडा) येथील रस्त्याच्या सिमारेषेतील भुखंडाबाबत आढावा, रात्री 8.15 वाजता पिपरी (मेघे) व ईतर 13 ग्रामपंचायती करीता सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे व पाईप लाईन लावण्याच्या कामाचा प्रगती आढावा व रात्री 8.30 वाजता झडशी येथील शासकीय जमिनीच्या अनधिकृत विक्री संदर्भात आढावा बैठकीस उपस्थिती. रात्री 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव रात्री 9.15 वाजता वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.