Now Loading

भाजपच्या तीन आजी - माजी आमदाराचे हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले उपोषण. हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाची झपाट्याने वाढ होेत असल्याचा आरोप करत भाजप च्या तिन आजी- माजी आमदार एकत्रित येत हिंगोली च्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं आहे. या उपोषणा मध्ये हिंगोली चे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, कळमनुरीचे माजी आमदार गजनान घुगे, व विधान परिषदेचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, सहभागी झाले झाले आहेत. यासह इतरही भाजपचे पदाधिकारी या उपोषांमध्ये सहभागी आहेत. हिंगोली जिल्ह्यात होणारे अवैध धंदे रेती, गुटखा, ऑनलाईन मटका, क्लब, दारू बंद करण्यात यावी अशी मागणी आमदारांनी केलीय. उपोषनापूर्वी निवेनादातून अवैध व्यवसाय बंद करण्याचा सूचक इशारा ही देन्यात आला होता परंतु या व्यवसायाला आळा नबसल्याने चक्क तिन आमदार मोहद्ययांना उपोषणाला बसांव लागल्याने जिल्हयात हा सद्या चर्चेचा विषय बनला आहे. हिंगोली येथील भाजप कार्यालयापासून पदाधिकारी व कार्यकर्ते अवैध धंद्या वाल्या विरुद्ध नारेबाजी करत पैदल जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले आहेत.