Now Loading

*ग्राम विकास अधिकारी,व वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चे अधिकारी लाचलुचपत जाळ्यात*

धुळे :- ग्राम विकास अधिकारी,व वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चे अधिकारी लाचलुचपत जाळ्यात अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे यांचा लावलेला सापळा यशस्वी झाला आहे.     सविस्तर वृत्त अशे आहे की तक्रारदार पुरुष,वय-37 वर्ष. यांनी दिलेल्या तक्रारीवरून, तक्रारदार यांचे मौजे शिरधाने धुळे येथे सिटी सर्वे नंबर 842 एकूण क्षेत्र 250 मी हा प्लॉट खरेदी केला असून सदर खरेदी केलेला प्लॉटची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद होऊन प्लॉटचा 8अ.चा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सदरील आरोपितांनी लाचेची मागणी करुन 35 हजार रुपये स्वीकारताना आज रोजी रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.   यामध्ये आरोपींची नावे अशी आहे. 1) जयश्री हरिश्‍चंद्र पाटील (वय 39) ग्राम विकास अधिकारी, शिरडाणे, ता.जिल्हा धुळे 2) संदीप नथू पाटील (वय 44) वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे दोन्ही राहणार प्लॉट नंबर 14 राका पार्क हायस्कूल जवळ वलवाडी,धुळे यांनी तक्रारदारा कडून लाचेची मागणी 16/11/2021 रोजी 35000/ केली व लाच 17/11/2021 रोजी 35000/- स्वीकारली आहे.   *सापळा अधिकारी*  प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे *सहा. सापळा अधिकारी*  मनजीतसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धुळे  सापळा पथकात कैलास जोहरे, शरद काटके, ,राजन कदम, कृष्णकांत वाडीले पुरुषोत्तम सोनवणे,प्रशांत चौधरी,भुषण खलानेकर, संतोष पावरा , संदिप कदम, महेश मोरे,गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे, बडगुजर. यांनी काम पाहिले तर मार्गदर्शक - *मा.श्री सुनील कडासने सो.* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक **मा.श्री.सतिष भामरे* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. *मा.श्री.सुनिल कुराडे* पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे हे होते,तर सक्षम अधिकारी- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,धुळे.हे होते.    *सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* *अँन्टी करप्शन ब्युरो,धुळे.*     संतोषी माता चौक धुळे. *@ दुरध्वनी क्रं. 02562-234020* *@ मोबा.क्रं. 9922447946,9657009727* *@ टोल फ्रि क्रं. 1064*