Now Loading

धनुर ग्रामसेवकांचा मनमानी कारभार ,तात्काळ बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी* *बंद ग्रामपंचायतीच्या दरवाज्याला दिले निवेदन*

*धनुर ग्रामसेवकांचा मनमानी कारभार ,तात्काळ बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी* बंद ग्रामपंचायतीच्या दरवाज्याला दिले निवेदन  धुळे तालुक्यातील धनुर लोणकुटे ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला धनुर ग्रामस्थ त्रासले असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी धनुर ग्रामस्थांनी केली आहे केली आहे,,ग्रामसेवक यांचा मनमानी कारभाराचा ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करत,बंद ग्रामपंचायतीच्या दरवाज्याला निवेदन दिले.धनुर लोणकुटे गृप ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले श्रीमती सुरेखा ढोले या सहा महिन्यापासून कार्यरत आहेत, त्या दिवसापासून त्या आठवड्यातून फक्त एक दिवस येतात.त्यामुळे ग्रामस्थांचे अनेक कामे अडून बसतात, आठ अ च्या उताऱ्यावर फेरफार साठी नावे लावण्यासाठी ग्रामस्थांना तीन-तीन चार-चार महिने फिरवून सुद्धा ग्रामस्थांची कामे होत नाही,ग्रामसेवकांचा मोबाईल सतत बंद असतो. म.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनगीर पोलीस स्टेशन यांनी गावा- गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्या अनुषंगाने गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून अध्यक्ष व सदस्य यांची यादी तसेच गावातले भांडण गावातच मिटावेत या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला सहकार्य म्हणून तंटामुक्त अध्यक्ष यांची नव्याने नेमणूक करून माहिती पोलीस स्टेशनला द्यावी या आशयाचे १९/०७/२०२१ रोजी पत्र दिले, त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, वसुलीसाठी ही त्या स्वतः फिरत नाहीत ग्रामपंचायत ऑपरेटर व शिपाई वसुलीसाठी फिरत असतात त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही परिणामी विकासकामांवर बोलायला गेलं तर वसुली नसल्याचे कारण दाखवण्यात येते .अशा या ग्रामसेवकांचा मनमानी कारभाराला ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ग्रामसेवकांची धनुर गावातून तात्काळ बदली करण्यात यावी व चांगले कार्यक्षम असे ग्रामसेवक नेमण्यात यावे अशी मागणी मा. उपसरपंच विजय चौधरी,शांतीलाल पाटेल ,संदेश पाटील ,राजकुमार दत्तात्रय पाटील ,साहेबराव कोळी, विजय पटेल, शामराव चौधरी विजय भामरे ,दीपक पाटील विलास जाधव ,निंबा पटेल, संभाजी बोरसे यांनी केली आहे