Now Loading

अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने केला मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न,चोरटा वडकी पोलिसांच्या ताब्यात

दि.18 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजताच्या दरम्यान राळेगाव चौफुलीवर असलेल्या उमेश मोबाईल शॉपिला चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याला गावकऱ्यांनी व वडकी पोलिसांनी रंगेहाथ पकडले, राळेगाव रोड वडकी येथे उमेश घेई यांच्या मालकीचे उमेश मोबाईल शॉपी चे दुकान आहे. नेहमीप्रमाणे काल दि 17 नोव्हेम्बर रोजी दुकान बंद करून उमेश च्या भावाला माल आनने करीता हिगनघाट जाने असल्याने संध्याकाळी 6/00 वा दरम्यान मोबाईल दुकान बंद करुन व्यवस्थीत लाँक लाउन निघुन गेला होता. दि.18 नोव्हेम्बर चे रोजी उमेश हा घरी झोपुन असताना रात्री 2/00 वा दरम्यान गोलु काटकर रा. लाडकी याने मोबाईल वरुन फोन करुन सांगितले की, तुझा मोबाईल दुकान मध्ये कोणीतरी ईसम दुकानाचे शटर काडुन आतमध्ये जाउन आहे यावरून मोबाईल दुकान वर जाउन पाहीले असता एक ईसम मोबाईल दुकान मध्ये चोरी करने करीता गेलेला दिसला. तेव्हा त्यास पकडले व त्याला नाव गाव विचारले असता व काहीही सांगत नव्हता तेव्हा ही माहिती वडकी पोलीसांना फोन द्वारे दिली असता घटनास्थळी वडकी पो,स्टे चे पी,एस आय मंगेश भोंगाडे यांनी लगेच घटनास्थळी येऊन त्या चोरट्याला नाव गाव विचारले असता अनिश हरिदेव मरावी वय 18 वर्ष रा बमनी देवरा ता घुगरी जि.मंडला मध्य प्रदेश असे सांगीतले व पोलीसांनी त्या चोरट्याला पोलीस स्टेशन ला नेऊन जेरबंद केले, रात्री दरम्यान मोबाईल दुकान फोडुन शटर ऊचलुन चोरटा चोरी करण्याचा उद्देशाने दुकानात घुसला व चोरी करीत असतांना त्याला रंगेहाथ पकडले अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे पी,एस आय मंगेश भोंगाडे करीत आहे.