Now Loading

१८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गौराळा येथे एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज १८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता च्या दरम्यान घडली. युवराज मधुकर धोबे (१८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेण्यात आला आहे. युवराज याच्या पाठिमागे आई वडील असा आप्त परिवार आहे. याघटने चा पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.