Now Loading

ग प्रभागात दिवा वसई रेल्वे लाईन जवळील श्री. कृष्णा मढवी यांच्या G+3 मजल्यांच्या आर.सी.सी. इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, उपआयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली ग प्रभाग सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील ‍दिवा वसई रेल्वे लाईन जवळील कृष्णा मढवी यांच्या G+3 मजल्यांच्या आर.सी.सी. इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर बांधकामधारकास नोटीस बजावण्यात आली होती. सदर कारवाई फ प्रभाग सहा. आयुक्त भरत पाटील, ग व फ अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत आणि 1 पोकलेन मशिनच्या सहायाने करण्यात आली.