Now Loading

कोरडे पाडा गावात नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर

पडघा वनक्षेत्र किरवली परिमंडळ मधील मौजे कोरडे पाडा गावात येथील जिल्हा परिषद शाळेत पक्षी सप्ताह च्या पार्श्वभूमीवर संयुक्त वन व्यवस्थापन समिती आवळे विश्वगड आयोजित व ओम सिद्धिविनायक फाउंडेशन, अंबरनाथ यांचे सौजन्याने परिसरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंबरनाथ येथील समाजसेविका निकिता सोपारकर यांच्या समवेत आलेले डॉक्टर वैशाली भगत व नरेंद खंगुरा यांनी सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी मोलाची मदत केली. किरवली वनपाल साहेबराव खरे यांनी पक्षी सप्ताह च्या पार्श्वभूमीवर सवस समिती मार्फत सदर कार्यक्रमचे संयोजन केले असल्याचे आपल्या भाषणात कथन केले. आभार प्रदर्शन अनंता जाधव सवस अध्यक्ष यांनी केले. विशेष आमंत्रित पाहुणे दिलीप माळी यांनी या कार्यक्रमाबाबत आयोजकांचे कौतुक केले. त्याच बरोबर समाजसेविका निकिता सोपारकर यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्या बद्दल सवस समिती आवळे विश्वगडचे सदस्यांचे आभार व्यक्त केले, या प्रसंगीं महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, या प्रसंगी सवस समितीचे सदस्य तथा ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगडचे सदस्य नंदा जाधव, गणेश जाधव, तसेच सदस्य गणेश शंकर जाधव, साईनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी वनरक्षक किरवली प्रमोद सुतार, ग्रामस्थ विलास कोरडे, लहू जाधव, शांताराम पाटील यांनी विषेश मेहनत घेतली.