Now Loading

राकेश टिकैत: संसदेत कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

गुरु नानक जयंतीनिमित्त आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक भागातील शेतकरी या कायद्यांना विरोध करत होते. या घोषणेने शेतकरी आंदोलन मागे घेतील, अशी अपेक्षा होती. पण संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. हे तिन्ही कायदे मागे घेण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी: Hindustan Times | News 18 | The Indian Express