Now Loading

कल्याणमध्ये गुरू नानक जयंती साजरी

कल्याणच्या गुरुद्वारामध्ये गुरू नानक यांची ५५२ वी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने साधेपणाने जयंती साजरी केली. तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची असलेली गर्दी यावेळी तुरळक होती. दिवसभर भाविकांची रेलचेल याठिकाणी पाहायला मिळाली. यावेळी धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुद्वाराच्या वतीने भाविकांसाठी लंगरचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे दरवर्षी निघणारी मिरवणूक मात्र रद्द करण्यात आली आली असल्याची माहिती गुरुसिंग सभाचे अध्यक्ष हरबीर सिंग हायर यांनी दिली.