Now Loading

कल्याणतील मंदिरांमधील काकड आरत्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट

वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्त्व असून कल्याणमधील विविध मंदिरातील विविध काकड आरत्यांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेटी दिल्या. कासार हाट मधील भक्तिधाम मंदिर, गौरीपाडा येथील कर्नाळा देवी मंदिर,आप्पा महाराज लेले समाधी तसेच आयोजक माऊली हरिपाठ मंडळ, भोईरपाडा, आदी मंदिरांना आयोजित केलेल्या काकड आरतीला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित राहून भजनी मंडळाचे कौतुक केले. कुंदाताई उगले यांच्या नेतृत्वातील विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ आयोजित कार्तिक स्नान महिना काकड आरती कार्यक्रमास भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष श्री.संजय मोरे,ह.भ.प.श्री. जगन्नाथ महाराज नेहरकर, ह.भ.प.श्री.चंद्रभान महाराज सांगळे, ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज साबळे, ह.भ.प. श्री.हरिभाऊ रामभाऊ आवटी, श्री.मृत्युंजय वेद शुक्लाजी यासोबतच भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री.अर्जुन म्हात्रे, कल्याण शहर उपाध्यक्ष श्री.भगवान म्हात्रे, ह.भ.प.सांगळे महाराज, गावचे पोलिस पाटील ह.भ.प.रघुनाथ म्हात्रे, गौरीपाडा, टावरीपाडा आणि भोईरपाडा ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ आदि. उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादतो. त्रिपुरारी पौर्णिमेर्पंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो, अशी समजूत आहेत. एकेकाळी सर्व गावकरी, परिसरातील लोक एकत्रित सामुहिकपणे काकडा आरती करीत. कल्याणमध्ये मात्र ही परंपरा सुरू असून या उपक्रमाचे नरेंद्र पवार यांनी कौतुक केले.