Now Loading

IND vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना, भारताला मालिका जिंकण्याची संधी

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 मालिकेतील दुसरा सामना आज झारखंडमधील रांची येथील JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. दुसरा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर पाहता येईल. त्याचवेळी झारखंड उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये ५० टक्के क्षमतेच्या स्टेडियममध्ये सामना खेळवला जाईल, असे म्हटले होते. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला आज मालिका जिंकायची आहे.