Now Loading

सोयाबीन दरवाढीसाठी हिंगोलीत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यरस्त्यावर टायर जाळून केले रास्तारोको आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा. रविंकात तुपकर यांच्या वतीने बुलढाना येथे सोयाबीन दरवाढी साठी अन्नत्याग आदोलंन सुरू असुन आज आंदोलनाचा तिसरा दिवस असुन या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हिंगोलीतील कनेरगाव राज्य रस्त्यावर कनेरगाव नाका येथे शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर टायर पेटवून दामोधर इगोले, विदर्भ अध्यक्ष माधव गाङे, यांच्या नेतृत्वाखाली हे आदोलंन करण्यात आले या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, संतोष सावके, चंद्रकांत सावके वैभव सावके,अक्षय सावके, गणेश सावके,भगवान तायडे,माधवराव सावके, ,संजय सावके आदीची उपस्थित होती कोनते अनुचित प्रकार घडू नये यासाठी कनेरगांव नाका चौकीचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव व ईतर पोलीस कर्मचारी तैनात होते.