Now Loading

कळमनुरी येथे दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र वाटप, खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाना दिलासा. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी,वसमत, हिंगोली, सेनगाव या चार तालुक्यातील दिव्यांगाचे तपासणी शिबीरा नंतर दिव्यांग लाभार्थांना मोफत, साहित्य वाटप करण्यात आले होते.यावेळी दिव्यांगानी खासदार हेमंत पाटील यांना जिल्हा रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी मोठी हेडसांड होत असल्याचे सांगितले होते याची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आलेल्या दिव्यांगाची आज उपजिल्हा रुग्णालयात तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरात सुमारे ३५० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एकही दिव्यांग बांधव प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये या भावनेने हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिर व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरात सुमारे ३५० दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आ. संतोष बांगर, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, माजी जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, शहरप्रमुख संतोष सारडा, माजी पं.स. उपसभापती गोपू पाटील, कळमनुरी उप जिल्हा रूग्णालयाचे डॉ. दत्तात्रय डोंगरे, डॉ.आनंद मेने, बाजीराव सवंडकर, नगरसेवक अप्पाराव शिंदे, राजु संगेकर, नामदेव कऱ्हाळे, संभाजी सोनुने, शिवराज पाटील, अनिल भोरे, बबलु पत्की, धनंजय पवार, मयुर शिंदे, जसवंत काळे, शिवम नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी खासदार हेमंत पाटील यांचे कळमनुरी जनसंपर्क अधिकारी अमोल बुद्रुक, हिंगोली जनसंपर्क अधिकारी गजानन थळपते, यांच्यासह मूक बधिर शाळेचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .