Now Loading

यवतमाळ येथे सरपंच सेवा महासंघ तसेच सरपंच माझ्या न्यूज चायनल च्या वतीने रणरागिनी पुरस्कार सोहळा तसेच सरपंच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यवतमाळ येथे सरपंच सेवा महासंघ तसेच सरपंच माझाच्या वतीने रणरागिनी पुरस्कार सोहळा तसेच सरपंच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्या बैठकीला उपस्थित माजी शिक्षण मंत्री तथा आदिवासी महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी पुरके साहेब - कल्पनाताई पुरके मॅडम . सरपंच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे .. सरपंच माझा चॅनलचे संचालक रामनाथ बोराडे .माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राळेगाव तालुका प्रफुलभाऊ मानकर .वि सी एम चे संचालक अरविंदभाऊ वाढोणकर .महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद यवतमाळ जयाताई पोटे सरपंच महासंघाचे कोर कमिटी सदस्य किशोरभाऊ धामंदे अंकुशभाऊ मुनेश्वर या सर्वांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार सरपंच महोदय तसेच कोरणा काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक-राजकीय .आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला तसेच पुरुष सर्व मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना माजी मंत्री वसंतरावजी पुरके यांनी सांगितले सरपंच यांच्यामधुन आमदार असला पाहिजे . त्यासाठी संघटनेच्या वतीने पुढाकार घ्या मी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्या सोबत येऊन विधानभवनामध्ये त्याचा पाठपुरावा करतो . असे त्यांनी त्यांच्या भाषणातुन सांगितले . आणि सरपंच महासंघाचे कार्य अतिशय चांगले आहे आणि असे जर कार्यकरीत राहिले तर निश्चितच सरपंच यांच्यामधून आमदार होणे ही बाब काही किचकट राहणार नाही .अर्चनाताई पखाण यांनी रणरागीणी पुरस्कार स्वीकारतांना सरपंच महासंघ सरपंच माझा यांचे कार्य अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे असे गौरवोद्गार काढले.