Now Loading

कोब्रा नाग भक्ष्य गिळून बेडरूममध्येच झाला सुस्त ; मात्र कुटूंबाची  उडाली झोप   .....   

एका इमारतीच्या घरातील बेडरूममध्ये कोब्रा नाग भक्ष्याच्या मागोमाग शिरला होता. त्यानंतर कोब्रा नागाने भक्ष्याची शिकार करून त्याला फस्त केल्याने तो बेडरूममध्ये सुस्त झाला. मात्र कोब्रा नागाला पाहून त्या घरातील कुटूंबाची झोपच उडाली होती. हि घटना  कल्याण पश्चिमेकडील  असलेल्या राधानगरी संकुलमधील एका इमारतीत घडली आहे.     भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी ..    नवीन  कल्याण  म्हणून  ओळख  निर्माण  झालेल्या   पश्चिमेकडील   परिसरात  मोठमोठी  गृह  संकुले  जंगल,  शेती   नष्ट करून  उभारली जात आहे.  त्यातच  गेल्या  ६ दिवसापासून  अचानक  वातावरण बदल्याने बिळातून   विषारी  –  बिन   विषारी   साप   भक्ष्य   शोधण्यासाठी   व   थंडी   पासून   बचावासाठी   मानवी   वस्तीत   शिरत   असल्याच्या    घटना   घडत   असतानाच   कल्याण  पश्चिम  मधील  राधानगरी  संकुल येथील   एका  इमारतीध्ये   विशाल  शिंदे  कुटूंबासह  तळ मजल्यावर  राहतात.  त्यातच  सायंकाळच्या  सुमारास  शिंदे  यांची  मुलगी   घरातील  वाशिंग  मशीन  शेजारी  अभ्यास  करण्यासाठी  बसली   होती.  मात्र   कोब्रा  नाग  भक्ष्याच्या  मागावर  असल्याचे  तिला  मशीन  खाली   दिसल्याने  तिने  नागाला  बघताच   घरातून  पळ  काढला.  आणि   घरात   नाग  शिरल्याची   माहिती   घरच्यांना   दिल्याने त्यांची झोपच उडाली होती. काही वेळातच    कोब्रा  नाग   बेडरूममध्ये  भक्ष्याच्या  मागोमाग  शिरला  होता.  तर  घरात  नाग  शिरल्याची  माहिती  विशाल  शिंदे  यांनी  सर्पमित्र हितेश  यांना दिली.   सर्पमित्र   हितेश  घटनस्थळी  येऊन   कोब्रा नागाला  पकडून  पिशवीत  बंद   केल्याने  शिंद कुटुंबाने सुटकेचा   निश्वास   घेतला.   हा  साप  इंडियन   कोब्रा    जातीचा   असून ३ फूट  लांबीचा   आहे.   या  जातीचे साप  खूपच विषारी असल्याची माहिती सर्पमित्राने  दिली.   विषारी घोणस बुकिंग ऑफिसच्या कुंडीत    ..   दुसऱ्या   घटनेत   एका  गृह  संकुलच्या  बुकिंग  ऑफिसच्या  आवारातील  एका  झाडाच्या   कुंडीत  विषारी  घोणस  कामगाराला  आढळून  आला.  त्याने  इतर  सहकार्यांना  विषारी  साप  ऑफिसच्या  आवारात  असल्याची  माहिती  देताच  ऑफिस  बंद  करून  सर्वच  कामगार  बाहेर  पाळले.  तर  विषारी  साप  ऑफिस  बाहेर  ठेवलेल्या  एका  कुंडीत असल्याची  माहिती  साईट  सुपरवाईजरन  सर्पमित्र  हितेश  यांना   दिली.  माहिती  मिळताच  सर्पमित्र हितेश  यांनी  काही वेळातच घटनास्थळी येऊन या  विषारी  सापाला पकडले,  हा  साप  ३  फूट लांबीचा   असून  अंत्यत  विषारी  अश्या   घोणस आहे.   सर्पमित्राने  या   सापाला पकडून  पिशवीत   बंद   केल्याने  कामगारांनी  सुटकेचा  निश्वास   घेतला.  सहा  दिवसात १० सापांना निर्सगाच्या सानिध्यात सोडून जीवदान    हिवाळ्याच्या दिवसात  विषारी - बिन विषारी  साप  भक्ष्य  व   उब  मिळावी म्हणून बिळातून  बाहेर  येऊन मानवीवस्तीत  शिरत  असल्याचे सर्पमित्रांचे  म्हणणे  असून  कुठेही  मानवी वस्तीत  साप  दिसल्यास   सर्पमित्रांना  याची  माहिती  तत्काळ  देण्याचे  अहवान  करण्यात  आले.  विशेष  म्हणजे  सहा  दिवसात  सात  विषारी आणि ३   बिन  विषारी  सापांना   वन  विभागाच्या  अधिकाऱ्याची  परवागी  घेवून  जंगलात  सोडून  दिले.  तर  आज या  दोन विषारी सापांनाही निर्सगाच्या  सानिध्यात  सोडणार  माहिती  सर्पमित्र  हितेश यांनी  दिली.