Now Loading

रेती तस्कराने पत्रकारास केला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न

केळापुर तालुक्यात महसुल व पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन खुलेआम पध्दतीने रेती तस्करी सुरु आहे. रेती तस्करीचे केन्द्रबिंदु पाटणबोरी व पिंपळखुटी हि दोन गावे आहे. पिंपळखुटी येथुन रेतीने भरुन आणलेल्या ट्रकचे आर. टि. ओ. चेक पोस्टजवळ व्हीडीओ चित्रीकरण करुन त्याची फेसबुक लाईव्ह करीत असलेल्या एका लोकल न्युज चॅनलच्या पत्रकारास रेती तस्कराने त्याच रेती भरुन असलेल्या ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ च्या मध्यरात्री साडे बारा ते एक वाजता दरम्यान घडली. वेळापुर तालुक्यातील रेती तस्करी सद्या डंक्यावर आहे. महसुल व पोलीस विभागातील काही संधी साधु अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हप्तेखाउ वृत्तीमुळे तालुक्यात रेती तस्करीने जोर पकडला आहे. रेती तस्कर दिवसरात्र रेतीचा अवैधरित्या उपसा करून त्याची वाहतुक करीत असताना महसुल व पोलीसांच्या अशा तस्करांवर कार्यवाह्या नाममात्र आहे. तालुक्यातील रेती तस्करीमध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी गुंतले असुन ते आपल्या पदाचा राजकीय पक्षाचा व लोक प्रतिनिधीच्या नावाचा हवाला देत खुलेआम रेती तस्करी करीत आहे. १८ च्या मध्यरात्री साडे बारा ते एक वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम. एच. ४० एन. ६५२५ मध्ये रेती भरून आणली असता, एका न्युज चॅनलच्या पत्रकाराने त्या रेतीच्या ट्रकची व्हिडीओ शुटींग करीत त्याची माहिती सांगणे सुरु होते. हा सर्व प्रकार लाईव्ह सुरु होता. ऐवढ्यातच रेती ट्रकचा मालक तेथे आला व त्याने त्या पत्रकारास धमकी देवुन बाजुला सरकरण्यास सांगितले. मात्र तो पत्रकार हटण्यास तयार नसल्याचे पाहुन त्या रेती तस्कराने आपल्या ट्रकच्या चालकास बाजुला सरकवुन तो ट्रकमध्ये बसला व त्याने स्टेरींग हातात घेवुन तो ट्रक चक्क त्या पत्रकाराच्या अंगावर आणला.यावेळी काही दूर पर्यंत तो पत्रकार ट्रकच्या समोर प्रतिकार करीत होता. काही वेळाने तो ट्रकच्या बाजुला सारल्या गेल्याने त्या रेती तस्कराने आपला ट्रक तेथुन पळवून नेला. हा सर्व प्रकार संबंधित पत्रकाराने फेसबुक लाईव्ह कव्हर केला होता. त्या पत्रकारासोबत एक महिला पत्रकार तथा कॅमेरामॅन सुध्दा उपस्थित होता. त्या पत्रकाराने संपुर्ण घटनेचे रात्रीच फेसबुक लाईव्ह केल्याने तो व्हीडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.