Now Loading

वनहक्क कायदा अंमलबजावणी कार्यशाळा संपन्न

उपविभागीय अधिकारी कार्यालय, राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भगवान मुंडा जयंती निमीत्य आज वनहक्क कायदा अंमलबजावणी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत वनहक्कर कायद व वैयक्तीक व सामुहीक वनहक्काची पुढील दीशा मांडण्यात आली. वैयक्तीक व सामुहीक वनहक्क मान्य झाल्याानंतर महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, वनविभाग, आदीवासी विकास विभाग, कृषी विभाग ,पशु संवर्धन विभाग व इ. विभागाची भुमीका व विविध विभागाच्या योजना बाबत माहीती देण्यात आली असुन प्रशासन व लोकसहभागातुन वनहक्क प्राप्‍त गावांचा शास्वत विकास होण्यास अधिक यशस्वी हावु याबाबात मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळेचे संचालन व मार्गदर्शन श्री. अनुप जामोदकर (तालुका व्यवस्थापक राळेगाव ) यांनी केले.सदर कार्यशाळेमध्ये .श्री. शैलेष काळे (उपविभागीय अधिकारी राळेगाव) यांनी वनहक्क कायदया अंतर्गत वैयक्तीक व सामुहीक वनहक्क. धारकांसाठी विविध विभागाच्याा योजना कार्यान्वीत करुन वनहक्क कायदयाची प्रभावी अंतलबजावणी करणेकरीता प्रेरक मार्गदर्शन केले. सोबतच मा.श्री. डॉ.कानडजे साहेब (तहसिलदार राळेगाव) व मा.श्री. मडावी साहेब (गटविकास अधिकारी राळेगाव), श्रीमती राऊत मॅडम (तालुका पशुसंवर्धन अधिकारी) राळेगाव यांनी त्यांचे संबधित विभागाची भुमिका व योजनेबाबत मार्गदर्शन केले.सोबतच मा.श्री. दिलीप बदकी साहेब नायब तहसिलदार , राळेगाव मा.श्री. अनिल माने साहेब (नायब तहसिलदार मेटीखेडा) श्री. शैलेश कणेर (तालुका व्यावस्थाळपक केळापुर ) श्री.अजय भाविक अव्वल कारकुन (जिल्हा वनहक्क कक्ष) तसेच उपविभागातील राळेगाव /कळंब तालुक्यातील वनहक्क प्राप्त गाव अधिनस्त ग्रामसेवक, तलाठी,मंडळ अधिकारी, वनक्षेत्रपाल,वनरक्षक व वैयक्ती‍क व सामुहीक वनहक्कक धारक व आदि सदर कार्यशाळेत उपस्थित होते. तसेच कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून श्री.रूपेशकुमार श्रृपवार (जिल्हार वनहक्क व्यवस्थापक) श्री. अनुप जामोदकर तालुका वनहक्क व्यवस्थापक राळेगाव यांनी मार्गदशर्न केले, कार्यक्रमाच्या शेवटी वैयक्तिक व व सामूहिक वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. महादेव सानप मंडळ अधिकारी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.