Now Loading

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त डोंबिवली गणेश मंदिरात दीपोत्सव  खाद्यतेल दानयज्ञासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रांगोळीतून आदरांजली

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त डोंबिवली गणेश मंदिरात दीपोत्सव खाद्यतेल दानयज्ञासह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रांगोळीतून आदरांजली गणेशमंदिर संस्थान, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांचा उपक्रम डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या  गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज सायंकाळी   दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या गाभार्यासह मंदिर परिसरात दिव्याची आरास आकर्षक पद्धतीने करण्यात आल्याने हि आरास पाहताना डोळ्याचे पारणे फिटले. मागील वर्षी देखील मंदिरात दिव्याची आरास करण्यात आली होती .मात्र कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांना या दीपोत्सवाचा आनंद घेता आला नव्हता यंदा मात्र डोंबिवलीकरांनी उत्साहाने या दीपोत्सवाला उपस्थिती लावत आनंद लुटला.तर दीपोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खाद्यतेल दानयज्ञात डोंबिवलीतील अनेक दानशूर दात्यांनी खाद्यतेलाचे तसेच खाद्य तेलासाठी आर्थिक मदतीचे दान मंदिरात जमा केले. खाद्यतेल दानयज्ञातून जमा होणारे खाद्यतेल सेवाभावीसंस्थांना, गोरगरीबांना, आश्रमशाळांना, एकल पालक अशा स्त्रियांना, वृद्धाश्रमांना तसेच दुर्गम भागातील आदिवासींना  मदत स्वरुपात देण्यात  येणार आहे.तर दिपोत्सवाच्या आणि खाद्यतेल दानयज्ञाच्या निमित्ताने या तीनही संस्थां डोंबिवलीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार  उमेश पांचाळ यांनी रांगोळीतून‌ शिवशाहिर  बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली वाहिली.