Now Loading

*पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांना राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे "समाजरत्न पुरस्कार" प्रदान* ------------------------------- *केज : तालुक्यातील नायगांव येथील भूमिपुत्र युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांना मानव विकास संस्थेचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे "राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार" प्रदान करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.८ नोव्हेंबर रोजी माजलगाव येथे मानव विकास संस्थेच्या वतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा जागतिक कीर्तीचे विचारवंत तथा 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दत्तात्रय मुजमुले यांना "राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.दत्तात्रय मुजमुले हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षापासून शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शाळेचे शिक्षण मिळावे म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रास सुरवात केली. त्याचबरोबर साक्षर भारत अभियाना अंतर्गत निरक्षराना साक्षरतेचे धडे देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे.सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत.विविध सामाजिक उपक्रम राबवणे,सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी मदत करणे,वंचित,गरीब, पीडितांच्या प्रश्नाला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम ते प्रामुख्याने करत असतात.त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत.त्याचबरोबर एन.जी.ओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस म्हणून ते महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना मदत करण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात देखील अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे.सध्या ते पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष असून दैनिक प्रभास केसरी या वृत्तपत्राचे ते काम करतात तर स्टार १ महाराष्ट्र या चॅनेल चे मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत या सर्व बाबींची नोंद घेवून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळीमाजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख ,माजलगाव चे आमदार प्रकाश दादा सोळंके,मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष मिलिंद आवाड,कार्यक्रमाचे आयोजक सुमंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.