Now Loading

दिक्षांत जोगदंड यांचे mpsc परिक्षेत घवघवीत यश संपादन केज तालुक्यातील बनसारोळा येथील मुळ रहिवासी व हल्ली अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकाच्या शेजारी असलेल्या अमृतनगर येथे राहणारे डॉ. दीक्षांत तुळशीराम जोगदंड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतून पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग १ या पदासाठी निवड झाली आहे. डॉ. दीक्षांत हे आवसगाव ता. केज येथील जि. प. प्रा. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक तुळशीराम जोगदंड यांचे चिरंजीव आहेत. डॉ. दीक्षांत जोगदंड यांनी आपले १ ते ५ वर्गाचे शिक्षण योगेश्वरी नूतन विद्यालय येथे पूर्ण केले. तर ६ ते १२ वर्गाचे शिक्षण त्यांनी सातारा येथील सैनिक विद्यालयातून पूर्ण केली. शिरवळ जि. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. दांतीवाडा गुजरात येथील “कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अॅण्ड एनिमल हजबंडरी” या महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. डॉ. दीक्षांत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग १ या पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. धिवार राजकुमार मो.9657401861.7264945786