Now Loading

‘जर्नी’ या चित्रपटातून प्रभूदेवा २ वर्षानंतर अभिनय क्षेत्रात परतणार आहे.

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर अभिनेता, नर्तक आणि दिग्दर्शक प्रभुदेवा दिग्दर्शक आशिष दुबे यांच्या 'जर्नी' या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या मध्यात सुरू होणार असून, त्यातील बहुतांश चित्रीकरण आग्रा आणि युरोपमध्ये होणार आहे. अंजुम रिझवी आणि आशिष दुबे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अंजुम रिझवी फिल्म कंपनी, मॅड फिल्म एंटरटेनमेंट आणि स्टॅग फिल्म्स एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार होणारी 'जर्नी' ही खूप भावनिक प्रेमकथा असेल. प्रभू देवाने सलमान खान स्टारर 'वॉन्टेड' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर त्यांनी 'राउडी राठौर', 'अॅक्शन जॅक्सन' आणि 'दबंग-3' सारखे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले.
 

Read more: News 18