Now Loading

सहकार सप्ताह अंतर्गत समन्वयातून हितगुज  उपक्रम   

नंदुरबार   सहकार भारती तर्फे दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह निमित्ताने सहकार क्षेत्रातील चेअरमन, बँक अधिकारी, व्यापारी यांच्याशी समन्वयातून हितगुज करण्यात येत आहे. त्यानुसार नंदुरबार येथील दि मोती अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड शाखेत हितगूज कार्यक्रम झाला. याप्रसंगी सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांनी सांगितले की, सहकार क्षेत्रात कार्य करणारे सर्वच साधक कार्यकर्ते आहेत. सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळातील घटकांना सामावून घेण्याचे धेय आहे. तसेच डिसेंबर महिन्यात लखनऊ येथे सहकार भारतीतर्फे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देखील पाठक यांनी दिली. सहकार सप्ताहांतर्गत दि मोती अर्बन को-ऑप बँक लिमिटेड तळोदाचे चेअरमन निखिलभाई तुरखिया , तळोदा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद सोनार यांचा जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक यांनी सन्मान केला. प्रास्ताविक सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे  यांनी केले. या कार्यक्रमास  दि मोती अर्बन बँकेचे शाखा अधिकारी नितीन वाणी, लेखापाल सौ. किरण पटेल, रोखपाल दीपिका पारेख, प्रतिभा पाटील, सागर नांदेडकर, योगेश शिंपी, किरण पाटील, करण नांदेडकर आदी उपस्थित होते. फोटो ओळी - नंदुरबार येथे सहकार भारती संस्थेतर्फे सहकार सप्ताहांतर्गत  समन्वयातून हितगूज उपक्रमांतर्गत त्रिमूर्ती अर्बन को-ऑपरेटिव बैंक कार्यालयात सनमान प्रसंगी उपस्थित मान्यवर.