Now Loading

ठेवीदारांना फसविणारया रिओ मल्टीनॅशनल ट्रेिंडंगला ग्राहक आयोगाचा दणका

धुळे  रिओ मल्टीनॅशनल ट्रेडिंग लि. औरंगाबाद प्रोटेक्ट बेस कंपनीत बंर्न लाईट इव्हेस्टमेंग स्कीममध्ये केलेली गुंतवणूक ठेवीदार हर्षल जोने यांना देण्यास टाळाटाळ करणारया ट्रेडिंग लि. कंपनीला ग्राहक आयोगाने दणका दिला आहे.  ठेवीदाराला फसवणारया रिओ मल्टीनॅशनल ट्रेंडिंग लि. ला ग्राहक आयोगाचा दणका श्री. हर्षल देविदास जोने रा.धुळे यांनी स्थानिक संचालक/ऐजंट मार्फत रिओ मल्टीनॅशनल ट्रेंडिंग लि. औरंगाबाद प्रॉडक्ट बेस कंपनी बर्नराईट इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये रु.पाच लाखाचे गुंतवणूक केली. रिओ कंपनी विविध शेती पूरक औषधे,कीटक नाशके व मानवी उपयोगासाठी प्रोटीन युक्त टॉनिक,व्हिटॅमिन व कॅल्शियम युक्त शक्ती वर्धक औषधांची निर्मिती व विक्री करते याच बरोबर इन्व्हेस्टमेंट योजना त्यावर व्याज त्यावर बोनस व पैठणी साड्यांची भेट दिली जात होती. ह्याप्रकारच्या योजना या रिओ कंपनी त्यांचे संचालक मंडळ,त्यांचे एजंट यांच्या मार्फतसेमिनार, मेळावेव वैक्तिक मिटींग घेऊन संभाव्य ठेवीदार व ग्राहक याना हेरून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात होते. ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीदारांनी ठेवीची रक्कम मागण्यास सुरवात केल्यामुळे सदर कंपनी व त्यांचे हस्तक ठेवीदारांना भूल थापा देऊ लागले, टाळाटाळ करू लागले ह्या प्रकारामुळे ग्राहक/ठेवीदार यांच्या लक्षात आले कि, आपली आर्थिक फसवणूक झालेली आहे. त्या फसवणूक झालेल्या ग्राहकातील मी एक ग्राहक आहे. मी रिओ कंपनी व त्यांचे साथीदार याना माझ्या ठेवीची रक्कम देण्याबाबत वेळोवेळी विनंती केली. मात्र टोपर्यँत ह्या कंपनींनी आपले ऑफिस बंध करून टाकले म्हणुन मी अ‍ॅड.चंद्रकांत मोहन येशीराव धुळे यांच्या मार्फत सर्व जवाबदार व्यकतीना नोटीस बजावली त्यानंतरही रिओ कंपनी व त्यांच्या साथीदारांनी माझ्या ठेवीची रक्कम दिली नाही. म्हणून नाईलाजाने मी अ‍ॅड.चंद्रकांत येशीराव यांच्या मार्फत धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवर कामकाज होऊन धुळे जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे आध्यक्ष/न्यायाधीश श्री. संजय बोरवाल साहेब व सदस्य तथा पॅनल जज श्रीमती. प्रतिभा पाटील यांनी खालील प्रमाणे आदेश पारित केलेत. ग्राहक आयोगाने कंपनीला ४५ दिवसांच्या आत तक्रारदाराला ६ लाख २५ हजार ६०० रूपये अधिक बोनसची रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी १५ हजार असे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत. ठेवीदार हर्षल जोने यांच्या बाजूने अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव यांनी कामकाज पाहिले.