Now Loading

झारखंड : धनबाद रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट, घटनेत नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय

माओवादी नक्षलवादी नेते प्रशांत बोस आणि त्यांची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीपीआयने भारत बंदची हाक दिली आहे. यादरम्यान झारखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी ट्रेनला लक्ष्य केले आहे. 12 तासांत नक्षलवाद्यांनी दोन मोठ्या घटना घडवून आणल्या आहेत. झारखंडमधील धनबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट. या घटनेनंतर डिझेल लोकोमोटिव्हचे इंजिन रुळावरून घसरले आहे. त्याचवेळी लातेहारमध्येही नक्षलवाद्यांनी ट्रॅक उडवून दिला आहे.