Now Loading

वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बारामती :-बारामती शहरातील गणेश मार्केट समोरील रस्त्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून गणेश मार्केट समोरील रस्त्यावर काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री केली असता सदर ठिकाणी तीन वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले सदर महिलांवर अनैतिक मानवी व्यापार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर ठिकाणावरून सर्व पीडित महिलांची सुटका करून त्यांना न्यायालयाच्या आदेशान्वये सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याहीपुढे अशाप्रकारे अनैतिक मानवी व्यापार करताना किंवा वेश्या व्यवसाय करताना कोणी मिळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे अभिजीत कांबळे पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक कल्याण खांडेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई कोठे पोलीस शिपाई सचिन कोकणे दशरथ इंगोले मनोज पवार यांनी केली.