Now Loading

 वेतनेर बी डी एस , त्रुटीतल्या अघोषित शाळा व शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा

 धुळे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्ष मा शुभांगी पाटील यांनी शिक्षकांच्या  विविध प्रश्नांसाठी पुणे येथे आयुक्तालय येथे जाऊन राज्याचे शिक्षण आयुक्त मा विशाल सोळंकी , तसेच संचालक माध्यमिक मा पालकर , संचालक प्राथमिक मा दिनकर टेमकर  यांची भेट घेतली व शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वेतनेतर बी डी एस तसेच दि 13 सप्टेंबर 2019 च्या शाळांमधील त्रुटी पुर्तता केलेल्या शाळांना निधी देणेबाबत तसेच नुकत्याच वित्त विभागाच्या फॉरमॅट मध्ये तपासण्यात आलेले अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या तपासणीत त्रुटीत आलेल्या शाळांच्या त्रुटी पूर्ततेसाठी निवेदने देऊन चर्चा करण्यात आली.  ज्या मध्ये सर्वप्रथम मा आयुक्त  यांच्या कडे वेतनेतर बी डी एस बाबत निवेदन दिले व मागणी केली की मागील अनेक महिन्यांपासून शासनाकडून फक्त वेतनाचाच बी डी एस येत असून वेतनेतर बी डी एस उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांचे वेतना व्यतिरिक्त इतर कोणतेही देयके मंजूर होत नाही ज्या मध्ये प्रामुख्याने मेडिकल बिले असतील ,शिक्षकांचा हक्काची पी एफ च्या रक्कम त्यांना मिळत नाही त्या मुळे मुलांचे लग्न, कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण या सारख्या गोष्टींसाठी देखिल शिक्षकांना  वेळेवर  पैसे उपलब्ध होत नाही. या वर मा आयुक्त यांनी सांगितले की मागील वर्षी कोविड च्या परिस्थितीत लॉक डाऊन मुळे  कोणीही बिले सादर केली नाहीत त्यामुळे मागिल वर्षाची तरतूद परत गेली व या वर्षी सर्वांनी बिले सादर केल्यामुळे मागच्या वर्षी ची बिले देखिल या वर्ष्याच्या तरतुदी मधून अदा केली त्यामुळे या वर्षी ची 90%बी डी एस ची तरतूद संपली असून केवळ 10%रक्कम शिल्लक आहे परंतु मागणी जास्त असल्यामुळे ती अपूर्ण आहे. यावर राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी सांगितले की, निधी उपलब्ध करण्या साठी पुरवणी मागणी टाकण्याची विनंती केली, त्यावर मा आयुक्त यांनी सांगितले की त्या साठी उद्याच शिक्षण मंत्री महोदय यांना घेऊन वित्तमंत्री मा अजित दादा पवार यांच्या सोबत चर्चा करून बी डी एस साठी पुरवणी निधी ची मागणी करतो असे आश्वासन दिले.     त्यानुसार आज मा आयुक्त व मा शिक्षण मंत्री यांनी वित्त मंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत मिटिंग आयोजित केली आहे. तसेच नुकत्याच वित्त विभागाच्या फॉरमॅट मध्ये तपासणी करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या राज्यातील अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत त्रुटी लावण्यात आलेल्या शाळांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये बहुसंख्य शाळा ह्या रोष्टर तपासणी नसल्या मुळे अपात्र केल्याचे दिसून येते विशेषतः नाशिक विभागातील शाळा या कारणास्तव अपात्र केल्याचे दिसून येते. त्या बाबत मा संचालक यांना सांगितले की या शाळा रोष्टर तपासणी बंद असल्याने गोषवारा देऊन पात्र करण्याबाबत या पूर्वीच मिटिंग मध्ये ठरले होते व या बाबत मा संचालक यांनी पत्र काढले होते.त्यावर मा संचालक यांनी सांगितले की ते पत्र रोष्टर तपासणी च्या अधिन राहून दिले होते पण तपासणी शिवाय शाळा पात्र होणार नाही. त्यामुळे राज्याध्यक्ष शुभांगी पाटील या विषयी प्रत्यक्ष आयुक्त साहेबांकडे या विषयी कैफियत मांडली व सांगितले की अद्यापही अनेक विभागात मागास वर्ग कक्षकडून रोष्टर तपासणी करण्यात येत नाही अश्या परिस्थितीत रोष्टर तपासणी मुळे शाळा अपात्र केल्यास शिक्षकांचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल त्यामुळे ही अट शिथिल करण्यात यावी किंवा पर्याय द्यावा. त्यावर मा आयुक्त साहेब यांनी सांगितले की,ज्या शाळा रोष्टर तपासणी मुळे अपात्र करण्यात आल्या आहेत त्या शाळांची यादी तयार करून त्या शाळांची विशेष बाब म्हणून रोष्टर तपासणी करण्यात यावी असे पत्र काढतो असे आश्वासन दिले* तसेच दि 13 सप्टेंबर 2019 रोजीच्या शाळांमध्ये त्रुटी तील शाळा ज्यांनी आता त्रुटी पूर्तता करून त्या पात्र आहेत त्या शाळांना निधी ची तरतूद करा अशी मागणी केली त्यावर मा आयुक्त यांनी सांगितले की उद्याच या शाळांच्या निधी साठी मा वित्त मंत्री अजित दादा पवार यांच्या कडे निधीची मागणी करणार असल्याचे सांगितले त्याच प्रमाणे धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या उशिरा आलेल्या अघोषित शाळा तपासून यादी लावण्यासाठी देखिल संचालक साहेब मा पालकर साहेब यांना विनंती केली व त्या शाळांची तपासणी करून त्याची यादी आज किंवा उद्या लावण्यात येणार आहे     त्याच बरोबर नाशिक विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत   दिवसभर पाठपुरावा व चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावले.