Now Loading

सोलापूर : पावणे तीन लाखाचा फ्रुट बियरचा साठा जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापूर : फ्रुट बियर ही आरोग्यास घातक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानुसार नुकतंच जाहीर केले आहे.त्यात मानवी विष्ठेमधील बॅक्टेरिया आढळून आला आहे.याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने भवानी पेठेत कारवाई करत सुमारे पावणे तीन लाखाचा फ्रुट बियरचा साठा व इतर साहित्य जप्त केले आहे. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रभाकर अनंतय्या भंडारी, वय ३९ वर्ष, राहणार मित्र नगर मस्जिद जवळील देवीच्या मंदिरजवळ बोळात, शेळगी. २) मोबीन बडेसाब शेख, रा. १०/४३, भवानी पेठ, असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. हेड कॉन्स्टेबल दिलीप मनोहर भालशंकर, विशेष पथक, पोलीस आयुक्त कार्यालय, यांनी फिर्याद दिली आहे. भवानी पेठेतील जयभवानी बगीचा समोर, पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी भंडारी व शेख हे दोघे श्री सुपर स्टार ड्रॉक्स फ्रुट बिअर या नावाखाली रासायनिक पदार्थाचा उपयोग करून विषारी दारु (फ्रुट बियर) ही बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचे मिळून आले. त्याठिकाणाहून पोलिसांनी कैरेट भरलेल्या बाटल्या, प्लास्टीक डबे, ड्रम, पाण्याची टाकी, स्टिल टाकी, रु दोन हॅन्डल मशीन, डिप फ्रिज, टेबल बाकडे, तीन चाकी रिक्षा, पॉनीथीन पिशव्या त्यात टोपण असलेल्या नोंदणी प्रमाणपत्र आदी २ लाख ७२ हजार ८२८ रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. तपास सपोनि कुलकर्णी करत आहेत.