Now Loading

'सिद्धेश्वर' चिमणी पाडकामाला भाजप नगरसेवकाचा विरोध ; कामगार व शेतकऱ्यांना घेऊन पालिकेला घेराव घालेन

सोलापूर : नवीन बोरामणी विमानतळचे काम चालूच आहे त्या ठिकाणी विमानतळ व्हावे ही आमची सुद्धा मागणी होते पण होटगी रोड येथील जुने विमानतळ शासनाने आदेश काढून त्याची जागा विक्री करावी ...असे असताना केवळ एक चांगल्या स्थितीत चालू असलेला सहकारी तत्त्वावर चालणारा जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना केवळ घाणेरडे राजकारण करण्याचे हेतूने बंद करण्याचा घाट घातला जात आहे त्याला आमच्या प्रचंड विरोध आहे.. जर सिद्धेश्वर कारखाना चिमणी पाडकाम केले तर भविष्यात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था परिस्थितीला मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील प्रसंगी शेतकरी व हजारो कामगार यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा इशारा भाजप नगरसेवक सुभाष शेजवाळ यांनी दिला.