Now Loading

विज मीटरमध्ये फेरफार करीत शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे 2 हजार 186 युनिट विज चोरी 3 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल

विज मीटरमध्ये फेरफार करीत शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे 2 हजार 186 युनिट विज चोरी 3 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे घरगुती वापराच्या वीज वितरण कंपनीच्या मीटरमध्ये फेरफार करीत 32 हजार 200 रुपये किमतीची 2 हजार 186 युनिटची चोरी झाल्याचे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आल्याने चिमठाणे वीज वितरण केंद्राचे कनिष्ट अभियंता ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यात सरदासिंगरतनसिंग गिरसे,सुरेश शांताराम चौधरी,दिलकोरबाई भीमसिंग गिरासे तिन्ही रा.तामथरे ता.शिंदखेडा यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही संशयितांनी घरगुती वापरासाठी घेतलेल्या वीज कनेक्शनच्या मीटरमध्ये सर्व्हिस वायरला कट मारून वीज चोरी करत असल्याचे तामथरे गावात 25 सप्टेंबर 2021 रोजी वीज वितरण कंपनीच्या चिमठाणे केंद्राचे कनिष्ट अभियंता सुभाष ठाकूर यांनी कर्मचारी राजेंद्र शिंदे, नितीन महाले यांनी पंचासह केलेल्या कारवाईत आढळून आले.त्यात सरदासिंग रतनसिंग गिरसे 15 हजार 510 रुपये किमतीची 1052 युनिट,सुरेश शांताराम चौधरी यांनी 7520 रुपये किंमतीची 520 युनिट तर दिलकोरबाई भीमसिंग गिरासे यांनी 9170 रुपये किमतीची 614 युनीट वीज चोरी केल्याचे उघडकीस आले त्यांना रीतसर वीज बील देऊन बिल भरण्याची मुदत देण्यात आली.परंतु या तीनही संशयितांनी मुदतीत वीज बिल भरले नसल्याने तिघांविरुद्ध 32 हजार 200 रुपये किमतीची 2 हजार 186 युनिट विजेची चोरी केल्याची तक्रार दिनेश सुभाष ठाकूर कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी मर्यादित चिमठाणे कक्ष 2 शिंदखेडा उपविभाग यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिल्याने शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध 0 नंबर ने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा पुढील करवाईसाठी शिंदखेडा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला