Now Loading

परीवहन मंत्र्यांची बैठक संपली,तोडगा नाहीच

त्गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे संप चालू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्या वतीने हायकोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील उपस्थित होते. मात्र या बैठकीत सध्या तरी कोणताच तोडगा निघालेला नाही. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. यासह, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.