Now Loading

सोलापुरातून दोन ऐश्वर्या, एक रविना स्वरासह,एक पूजा झाली बेपत्ता ; प्रमाण वाढले

सोलापूर : सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून विवाहित महिला तरुण मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे यातच आता दोन ऐश्वर्या नावाची एक महिला व मुलगी, एक रवीना व एक पूजा नावाची महिला तसेच छोटी मुलगी स्वरा हे बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रविना सागर थपटे वय 26 वर्षे व स्वरा थपटे वय 3 वर्ष, राहणार जुळे सोलापुर सहयोग नगर न्यु म्हाडा कॉलनी विजापुर रोड दोघी दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता पती सागर थपटे यांच्या सोबत मोटारसायकल वरून निसर्ग हॉटेल येथे जेवण्यासाठी जाताना मुलीला तहान लागल्याने गाडी बाळयाजवळ पुलाच्या साईटला थांबवुन पाणी आणण्यासाठी सागर हे गेले व नंतर पाणी बाटली घेवून आल्यावर त्यांना पत्नी रविना व मुलगी स्वरा दोघीजणी गाडीजवळ दिसल्या नाहित. त्यांनी इकडे-तिकडे बधितले पण दोघीही दिसुन आले नाहीत. शेवटी त्यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली. ऐश्वर्या अनिल विभुते वय २४ रा १५ पंकज निलय अपार्टमेंट महादेव मंदिराजवळ भवानी पेठ व कु. ऐश्वर्या विनायक केत वय २४ रा.५६ वांगी रोड लिमयेवाडी या दोघी दि. १७ नोव्हेंबर रोजी दोनच्या दरम्यान पंकज निलय अपार्टमेंट सोलापूर येथुन कोणालाही काही एक न सांगता निघुन गेल्या आहेत. म्हणून अर्जदार शुभम अनिल विभुले यांनी व त्यांचे नातेवाईकांनी त्या दोघीचा सोलापूरात ठिकठिकाणी नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु त्या मिळुन न आल्याने जोडभावी पेठ पोलीस ठाणेस अर्ज केला आहे. पुजा संतोष चौड़े वय 21 वर्षे व्यवसाय शिक्षण राहणार भवानी पेठ मड्डी वस्ती जुना तुळजापुर नाका ही दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास आहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात क्लास प्रॉक्टीकल असल्याने वडील संतोष चौंडे यांनी तिला त्यांच्या मोटरसायकलवरुन अहिल्यादेवी होळकर महाविदयालयाच्या गेट समोर सोडुन परत घरी आले. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास अर्जदारचे मेहुणे धनंजय कोळी यांच्या मोबाईलवर फोन आला तो क्र.9061422032 असा एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तो म्हणाला मी गणेश बाबुराव बंडगर बोलतो तुमची पुजा 11 वाजल्यापासून माझ्या सोबत आहे. तिचे- माझे गेले 05 वर्षापासुन संबंध आहेत. तुम्ही तिला शोधू नका असे म्हणून मोबाईल बंद केला.याप्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गणेश बंडगर याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.