Now Loading

विज ग्राहकांनो सवलीमध्ये विज बील भरा सहकार्य करा विज कट करण्याची कटु कारवाई टाळा - उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार आष्टी ( रिपोर्टर ) :- कोरोना महामारी मुळे लाॅकडाऊन काळात विज ग्राहकांकडे काेट्यवधीची थकबाकी आहे. काेट्यवधींची भर पडल्याने महावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.तालुक्यातील १९ हजार ५५७ शेती पंपाचे ग्राहक असून ३५३ कोटी थकबाकी आहे.सध्या बिज बील सवलत २०२० योजना चालू आहे.६० ते ६५ टक्के सवलतीमध्ये आपले विज बील भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन आष्टी चे उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी केले आहे.